Ad will apear here
Next
हिमायतनगरमधील पाच शिवसैनिक अयोध्येला रवाना


हिमायतनगर :
शहरातील पाच शिवसैनिक २२ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी सात वाजता हिमायतनगर येथून अयोध्येला रवाना झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्या मंदिर बांधकामाच्या मागणीसाठी शिवसैनिक अयोध्येत जमणार आहेत. त्यासाठी हिमायतनगर शहरातील शिवसेनेचे प्रमुख नगरसेवक रामभाऊ ठाकरे, उप-तालुकाप्रमुख विलास वानखेडे, राम नरवाडे, रमेश गुडेटवार, सुनील चव्हाण हे पाच जण अयोध्येला रवाना झाले आहेत.
 


परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर श्रीश्रीमाळ, नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी त्यांचा गौरव करून, फटाक्यांची आतषबाजी करून, बँड वाजवून या पाच शिवसैनिकांना निरोप दिला. या वेळी बजरंग दल तालुकाप्रमुख गजाननभाऊ चायल, नगरसेवक प्रतिनिधी सावन डाके, शिवसेना शहरप्रमुख प्रकाश रामदिनवार, अनिल भोरे, भावराव वानखेडे, खंडू चव्हाण, युवा सेनेचे उप-जिल्हाप्रमुख योगेश चिल्कावार, बंडूभाऊ अनगुलवार, गजानन पाळजकर, सूरज दासेवार, हनुशिंग ठाकूर, अनिल नाईक, कल्याणसिंग ठाकूर, मंगेश धुमाळे, शिवतेज मित्रमंडळाचे संस्थापक शुभमभाऊ दंडेवाड, नागेश शिंदे, मंगेश शिंदे, आकाश वानखेडे, शंकर जाधव, अक्षय पाटील, आदर्श हेंदे, शरद परोटे यांसह गावातील असंख्य हिंदू बांधव उपस्थित होते. त्यांनी शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZPHBU
Similar Posts
बाळासाहेब ठाकरे यांना हिमायतनगरमध्ये अभिवादन हिमायतनगर : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त १७ नोव्हेंबर २०१८ रोजी हिमायतनगरमधील शिवसैनिकांनी त्यांना अभिवादन केले. त्यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या लावून, त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पर्जन्ययाग रुद्र स्वाहाकाराची सांगता मुसळधार पावसाने हिमायतनगर : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले, तरीही हिमायतनगर तालुक्यात पाऊस झाला नसल्यामुळे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रेरणेतून हदगांव-हिमायतनगर मतदारसंघात पर्जन्ययाग रुद्र स्वाहाकार महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची सांगता २७ जुलैला मुसळधार पावसाने झाली.
हेमंत पाटील यांच्या विजयानंतर हिमायतनगरात जल्लोष हिमायतनगर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील यांचा दोन लाख ७५ हजार १०३ मताधिक्याने विजय झाला. त्यानंतर हिमायतनगर शहरात व तालुक्यातील गावागावांत शिवसेना व भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळून, शहरात भव्य रॅली काढून, लोकांना साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला
हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा हिमायतनगर : हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांना १५ मे रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी, तसेच समाजाच्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या. ‘जनकल्याणकारी युवा नेता’ अशी ओळख त्यांनी अल्पावधीतच आपल्या कामामुळे निर्माण केली असल्याचे नागरिक सांगतात.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language